
एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट

एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट ची स्थापना श्री राहुल वि कराड यांनी २००५ साली सुशिक्षित तरुणांनी सक्रिय राजकारणात यावे या उद्देशाने केली आहे. कै टि न शेषन माजी मुख्य आयुक्त निवडणूक आयोग, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिला सक्रिय राजकारणाच्या अभ्यासक्रमाची पायाभरणी झाली.
मास्टर्स प्रोग्रॅम इन पोलिटिकल लिडरशिप अँड गव्हर्नमेंट या विषयात पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध आहे. सामान्य घरातील विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करून सक्रिय राजकारणात जाऊन देशसेवा करतील असा मूळ उद्देश अभ्यासक्रम बनवण्यामागे आहे.
५० % वर्गामध्ये आणि ५० % अभ्यास दौरे अशा प्रकारे 'अनुभवातून शिक्षण' शिकवण्यात येते. राजकीय नेते, शासकीय अधिकारी, पत्रकार, राजकीय विश्लेषक अशा विविध क्षेत्रातील नामवंताच्या मार्गदर्शनाचा विध्यार्थ्यांना लाभ होतो. स्ट्रॅटेजी व्यवस्थापन, भाषण कला, निवडणुकीचे व्यवस्थापन, विधिमंडळाचे कामकाज, आंतरराष्ट्रीय कामकाजाचे मुद्दे असे विविध विषय विध्यार्थ्यांना शिकवण्यात येतात.


